कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नोट प्रेस पाच दिवस बंद!

नाशिक (प्रतिनिधी) : अनलॉक टप्पा सुरु झाल्यानंतर ८ जून रोजी नाशिक शहरातील दोन्ही प्रेस सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु प्रेस सुरु झाल्यापासून तेथील कामगारांना कोरोनाची लागण होत असल्याने रविवारपासून (दि.३०) पाच दिवस म्हणजेच ३ सप्टेंबरपर्यंत प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय मुद्रणालय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे सलग पाच दिवस दोन्ही प्रेस बंद राहणार आहेत. तसेच सुट्टीच्या दिवशी कामगारांनी घरीच राहून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी असे आवाहन मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, सुनील शिरसाठ आणि अभिजीत आहेर यांनी केले.