कोयत्याचा धाक दाखवून परिसरात दहशत माजविणारे ते पोलिसांच्या ताब्यात….

नाशिक (प्रतिनिधी) : परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करून धारदार कोयत्याचा धाक दाखवत दोघे जण परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात अशा तक्रारी इंदिरानगर पोलिसांना काही दिवसांपासून येत होत्या. त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली आहे.

बुधवारी (दि.१६) रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसांचे गुन्हे शोध पथक आणि आणि सीआर मोबाईल व्हॅन परिसरत गस्त घालत असताना त्यादरम्यान संशयीत अमोल रमेश गवळी (वय २५. रा. सौभाग्य,नगर देवळाली कॅम्प) आणि जॉन चलन पडेशी (वय २५, रा.देवळाली कॅम्प) यातील अमोल हा कोयता घेऊन आणि त्याच्या सह जॉन दहशत माजवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांची  गाडी बघतच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी रिक्षा चालकाच्या मदतीने पाठलाग करत अटक केली. आणि दोघविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.