केंद्रीय पथकाच्या अचानक भेटीने आरोग्य विभाग धास्तावला

नाशिक (प्रतिनिधी):  केंद्र शासनाकडून वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात. स्वच्छतेवरील योजनांवर तर जास्त भर दिला जातो. त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धे अंतर्गत महापालिकेने हागणदारीमुक्तीसाठी केलेल्या प्रस्तावाला अनुसरून केंद्रीय पथकाने तीन दिवसांआधी अचानक भेट दिली व सविस्तर पाहणी केली. या अचानक झालेल्या आगमनामुळे  मनपाचा आरोग्य विभाग धास्तावला होता.

या पथकाने पाहणी करून माहिती संकलित केली व ती सादरही केली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणासाठी केंद्र शासनाने अनेक बदल केले आहेत. या नुसारच महापालिकेने हागणदारीमुक्त शहर व वॉटर प्लससाठी प्रस्ताव सादर केला आहे. यामुळेच महापालिकेच्या दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी हे पथक नाशिक मध्ये अचानक दाखल झाले होते.