कुत्र्याने चावा घेतल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : कुत्र्याने चावा घेतल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नाशिकला घडली आहे. भागवत विश्वनाथ खैरनार (राहणार: देशमुख चाळ, तळे नगर, रामवाडी, पंचवटी) असे या मयताचे नाव आहे. २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रामकुंड येथील एकमुखी दत्त मंदिराजवळ एका कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीस चावा घेतला होता.

त्यांना तत्काळ औषधोपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.