काठे गल्लीत गॅसगळती झाल्याने चौघे भाजले!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील काठेगल्लीत बनकर चौकामध्ये एका घरात गॅसगळती होऊन आगीच्या भडक्यात चौघे भाजल्याची घटना घडली आहे. काठेगल्लीतील बनकर चौकामध्ये शिवनेरी अपार्टमेंट या ठिकाणी अख्तर कुटुंबीय राहते.

सदर कुटुंबाच्या घरातून मंगळवारी (दि.१३ ऑक्टोबर) रोजी सकाळी सातच्या सुमारास धूर निघत असल्याचे काही नागरिकांना दिसले. तसेच आगीचा भडका उडाल्याने घरातील सदस्यांनी बचावासाठी आरडाओरड केली. म्हणून नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दल व पोलिसांना दिली. या घटनेदरम्यान अली अख्तर (५०), रुबिना अख्तर (४५), रमजान अख्‍तर (२८), रुख्साना अख्तर (२५) हे चौघे जण भाजल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. तसेच घटनेच्या आदल्या रात्री गॅस सुरूच राहिल्याने सकाळी गॅसगळती झाली.व सकाळी आग लागल्याची माहितीही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.