काच अंगावर पडल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील अंबड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत असतांना कामगाराच्या अंगावर काच पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

गुरुवारी (दि.२८) संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. अमोल भिकन कोळी (वय २८, रा. राणाप्रताप चौक) असे या घटनेत मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे. अमोल हे स्लाईडवेल नावाच्या कंपनीत काम करत होते. स्टोअर विभागात काम करत असतांना तेथे असलेली काच अचानक त्यांच्या अंगावर पडली. या घटनेत अमोल हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू