कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या…

नाशिक (प्रतिनिधी) : कंपनीत सतत होणाऱ्या मानसिक त्रासामुळे कंटाळून एका ४१ वर्षीय अधिकाऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मिनेश चंद्रात्रे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर परिसरात सानुश्री निधी लिमिटेड ही शाखा आहे. या शाखेत मिनेश चंद्रात्रे प्रमुख म्हणून काम पाहत होते. त्यावेळी कंपनीतील तिघा कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मिनेश यांच्याकडची कंपनीची महत्वाची कागदपत्रे काढून घेतली. तसेच २० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला. या त्रासाला कंटाळून मिनेश यांनी दिंडोरी वनविभागाच्या शिवारात शनिवारी (दि.०९) विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.