नाशिक (प्रतिनिधी) : मागील ३० वर्षांपासून रखडलेल्या ओझर ग्रामपालिकेचे नगर परिषदेमध्ये रूपांतर होणार आहे. ५ तारखेला शासनाने परिपत्रक काढले होते परंतु त्याची अधिकृत घोषणा आज होणार होती.
ओझर नगर परिषदेची ४ डिसेंबरला शासनाने काढलेल्या परिपत्रकामध्ये प्राथमिक घोषणा झाली असून, शासकीय स्तरावर होणे बाकी होती ती आज दिनांक ७ रोजी होणार असून, या येणाऱ्या महिन्यात तिच्यावर प्रक्रिया होऊन तिचे रूपांतर होणार आहे. नगर परिषद झाल्यानंतर करावर कोणतेही परिणाम होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या निर्णयाबाबतची बैठक ओझर सोसायटीच्या सभागृहात झाली. याच बैठकीमध्ये माजी आमदार अनिल कदम यांनी याबद्दलची माहिती दिली. बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे इतर सदस्य देखील उपस्थित होते.