एटीएम कर्मचाऱ्यांनीच पासवर्ड वापरून लांबवले लाखो रुपये!

नाशिक (प्रतिनिधी) :  नाशिकमधील टाकळीरोड येथे राहणाऱ्या दोन संशयितांनी संगनमत करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. एटीएम मशीन मध्ये पैसे पाठवलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीने दिलेला पासवर्डचा वापर करून ८ लाख ५६ हजार रुपये परस्पर काढून घेतले. त्यामुळे या दोघांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तट इंडीकॅश कंपनीचे दोन कर्मचारी वैभव काशिनाथ वर्पे आणि लुकमान मुबारक तडवी या दोघांना कट्या मारुती चौक आणि मखमलाबाद नका येथे असलेल्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी पाठवले होते. हे पैसे जमा करण्यासाठी विशेष पासवर्ड दिला जातो. त्या पासवर्ड चा वापर करून मशीनमधून परस्पर पासिये काढून घेतले.