उद्या खा. शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा नाशिक दौरा !

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आणि दिवसाला २०० ते ३०० रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकला दौरा करणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले होते. त्यांच्या दौऱ्याआधी उद्या (दि.२४) खा. शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. नाशिकला भेट देऊन ते नाशिकच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.