उद्यापासून (दि.२८) सलून सुरु, पण….

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या ३ महिन्यांपासून सलून बंद असल्याने नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला होता. काही दिवसांपूर्वी सलून व्यावसायिकांनी यासंदर्भात निर्णय व्हावा यासाठी आंदोलने सुद्धा केली होती. राज्य सरकारने आता पुन्हा सलून सुरून करण्याची परवानगी दिली असून नाभिक वर्गाला दिलासा मिळाला आहे.

उद्यापासून शहरातले सलून सुरु होणार आहेत. यासंदर्भातील नियम व अटींची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. सलून सुरु करायला परवानगी जरी दिली असली तरी त्यासाठी राज्य सरकारने काही नियम व अति लागू केल्या आहेत. फक्त केस कापायला परवानगी आहे दाढी करण्यास परवानगी नाही. यामध्ये केस कापणारा आणि केस कापून घेणारा या दोघांनीही मास्क लावणे बंधनकारक असेल. ब्युटी पार्लर, स्पा, जिम इत्यादी बंदच राहतील.