ई-पास काढून देतो सांगत हजारोंचा गंडा!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास ची सक्ती करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या संकटकाळात सरकारच्या या उपाययोजनेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार समोर येत होते. त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. अखेर पोलिसांनी या प्रकारचा तपास लावला.

गुहागर येथील ई-पास काढून देण्यासाठी प्रति पास २००० रुपये खर्च लागतील असे सांगून लुबाडणाऱ्या कृष्णा सुर्वे या ३२ वर्षीय इसमाला पोलिसांनी गजाआड केले. ठाणे, मुंबईवरून ई पास बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता नाशिकहून पास काढण्यात येईल असे तो सांगायचा. अधिक विचारपूस केली असता मुंबई वरून रत्नागिरी जाण्यासाठी १० ते १५ प्रवाशांना पास काढून दिल्याचे सांगितले.