इगतपुरीच्या व्हिंटेज व्हॅली येथे महिलेवर अत्याचार; एकास पोलिस कोठडी

इगतपुरीच्या व्हिंटेज व्हॅली येथे महिलेवर अत्याचार; एकास पोलिस कोठडी

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी शहराजवळील तळेगाव शिवारातील एका इमारतीच्या जवळील पत्र्याच्या शेडमध्ये एका २५ वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील व्हिंटेज व्हॅली नावाच्या इमारतीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये २५ वर्षांच्या विवाहितेवर हेमंत नागेश शिरोरे (४६, कलानगर, दिंडोरीरोड, नाशिक) याने अत्याचार केला. रात्री ९ वाजेच्या सुमारास हेमंत शिरोरे याने फिर्यादी महिला रहात असलेल्या शेडमधील घरात येऊन जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत पीडित महिलेने पतीसमवेत इगतपुरी पोलिस ठाण्यात येऊन संबंधितावर गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी संशयित हेमंत शिरोरे यास अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याबाबत पोलिस निरीक्षक समाधान नागरे, पोलिस कर्मचारी तपास करत आहे.
Amazon देतंय किराणा मालावर घसघशीत सुट.. ऑफर फक्त आजच्यासाठीच मर्यादित..
महत्वाची बातमी: नाशिक शहरात या तारखेपासून नो हेल्मेट, नो पेट्रोल ! पंपांवर सीसीटिव्ही !