इंदिरानगर हद्दीतले तिघे गुन्हेगार तडीपार!

नाशिक (प्रतिनिधी) : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. हे तिघे सराईत गुन्हेगार आहेत.

वडाळागाव परिसरात राहणारे मुजहिद ऊर्फ गोल्डी अफजल खान, अकिल लतीफ शेख आणि मनोज महादेव शेंडगे असे या तिघा सराईत गुन्हेगारांचे नाव आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांची चौकशी करून दोन वर्षे शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.