इंदिरानगर पोलिसांचे आवाहन; बेवारस वाहनांची ओळख पटवा आणि घेऊन जा !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे येथे बेवारस स्थितीत पडलेल्या तसेच विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या एकूण १६ बेवारस दुचाकी पडून आहेत. त्यामुळे ही वाहने दुचाकी मालकांनी ८ दिवसांमध्ये ओळख पटवून घेऊन जावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी केले आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षांपासून, विविध गुन्ह्यांतील बेवारस १६ दुचाकी वाहने त्यांच्या मालकांनी कागदपत्रांसह ओळख पटवून घेऊन जावे. नाही तर, सरकारी नियमान्वये कारवाई करण्यात येईल. असे इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तर, वाहनांचे मूळ मालक सापडत नसल्याने ही वाहने पोलीस ठाण्याच्या हद्दीत पडून आहेत. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसराचे चित्र अशोभनीय व खराब दिसते. त्यामुळे ही मोहीम राबवण्यात आली असून, वाहने नादुरुस्त व जुनाट अवस्थेत आहेत.