इंदिरानगर परिसरात दुकान फोडून चोरी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास काही चोरट्यांनी दुकान फोडून लाखो रुपयांचा माल लंपास केला. गेल्या आठ दिवसांत या परिसरातील चोरीची ही दुसरी घटना आहे. सदर प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अशा घटनांमुळे इंदिरानगर परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

नाशिक शहरातील अवैध धंद्यांवर कार्यवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिस कारवाई देखील करत आहेत. तर, दुसरीकडे मात्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याचे चित्र आहे.

नाशिकच्या इंदिरानगर परिसरात दुकान फोडून चार ते पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी पहाटे चारच्या सुमारास चोरुन नेला आहे. गॅस कटरच्या साहाय्याने ही चोरी करण्यात आली आहे. ज्यात लॅपटॉप ,मोबाइल तसेच मोबाईल ऍक्सेसरी आदी वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.
संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी इथे क्लिक करा