आहेरगावच्या जवानाला वीरमरण ; तो फोन ठरला शेवटचा….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधल्या निफाड तालुक्यात आहेरगाव येथे राहणाऱ्या जवानाचा पंजाब येथील पठाणकोट येथे आपली कामगिरी बजावत असतांना मृत्यू झाला. सुदर्शन दत्तात्रय देखमुख असे या वीर जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सिन्नर तालुक्यात राहणाऱ्या सुदर्शन दत्तात्रय देशमुख यांचा सोमवारी (दि.९) रात्री १० वाजेच्या सुमारास आहेरगाव येथे राहणाऱ्या कुटुंबियांशी फोनवर बोलणं झालं. तेव्हा सुदर्शन यांना चांदवड येथे घर घेण्यासाठी जागा घेण्याची इच्छा आहे असं वडिलांना सांगितलं. त्यानंतर रात्री दोन अडीचच्या सुमारास सुदर्शन यांना वीरमरण आल्याची माहिती घरच्यांना मिळाली. त्यामुळे तो फोन अखेरचा फोन ठरला. आणि सुदर्शन यांचे स्वप्न काही क्षणात मावळले. सुदर्शन यांच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ आहे.