आयटीआय रोड वाहतुकीसाठी बंद

नाशिक (प्रतिनिधी): राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बुधवारी (दि.3) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील काही वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून जाहीर करण्यात आले आहे. नॅब शिक्षण संस्थेच्या वसतिगृह इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी कोश्यारी उपस्थित राहणार असल्यामुळे नॅब टी पॉईंट (आयटीआय सिश्रल कॉर्नर) हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

या संपूर्ण रस्त्याला ‘नो व्हेइकल झोन’ घोषित करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी 3 ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या रस्त्यावर सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेज्ञास मज्जाव करण्यात आला आहे. सातपूर एमआयडीसीकडून ज्योती स्टक्‍्चरकडे येणारी वाहने ‘सकाळ’ सर्कलपर्यंत सरळ येतील आणि सर्कलवरुन सातपूर रोडने पुढे मार्गस्थ होतील, असे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. ही अधिसूचना आपत्कालीन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कोणत्याही वाहनांना लागू राहणार नसल्याचे स्पष्ट यात करण्यात आले आहे.