आयटीआय प्रथम फेरी प्रवेशासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ!

नाशिक (प्रतिनिधी) : सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सत्र ऑगस्ट 2020 साठी असलेल्या प्रथम फेरी प्रवेशासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मानकर यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, प्रथम फेरी प्रवेश 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत होणार होते;  मात्र संचलनालयाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या साठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड प्रथम फेरी प्रवेशासाठी झालेली अशा विद्यार्थ्यांनी सातपूर येथील संस्थेत 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा, असेही प्राचार्य मानकर यांनी कळविले आहे.