आधी पाळीव कुत्र्याला दिला सिगरेटचा चटका, मग मालकालाही केली मारहाण….

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड परिसरात कुत्र्याला चटका देऊन त्यानंतर मालकाला भावाकडूनच मारहाण झाल्याचा प्रकार रविवारी घडला आहे.

मीरा दलीचंद मारवाडी यांनी याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे मोहन हे फिर्यादीच्या दुकानात येऊन त्यांच्या पाळलेल्या कुत्र्याला मोहन यांनी सिगरेटचा चटका दिला. त्यामुळे मीरा दलीचंद हे रागावून त्यांना म्हणाले “मुक्या जनावराने तुझे काय बिघडवले आहे, तुला मारायचे आहे तर तू मला मार, मुक्या जनावरावर राग काढू नको.” आणि असे बोलण्याचा राग येऊन मोहन यांनी मीरा दलीचंद यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मीरा दालीचंद हे अपंग असल्याने त्यांच्या डाव्या डोळ्यावर सांडशीने मारून त्यांना गंभीर दुखापत केली. त्यानंतर मीरा दालीचंद यांनी घरी फोन करून त्यांची बहिण रत्ना यांना कळवले म्हणून “तुझा गेमच करतो.” असे म्हणून पळून गेले.