नाशिकरोड: आत्यासह भाच्याची रेल्वेखाली आ’त्मह’त्या

नाशिकरोड: आत्यासह भाच्याची रेल्वेखाली आ’त्मह’त्या

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील एकलहरे नाशिकरोड शिवारात आत्या व भाच्याने रेल्वे खाली आ’त्म’ह’त्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या जोरदार ध’डकेने दोघांचे मृ’तदेह छि’न्नविछि’न्न अवस्थेत मिळून आले, पोलीस तपासात मृत महिला जेलरोड भागातील असून सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील त्यांचा भाचा असल्याचे समोर आले.

आत्या-भाच्याने एकत्रीत केलेल्या आ’त्म’ह’त्येचे कारण समजू शकले नाही, नाशिकरोड पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिकरोड-ओढा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान शनिवारी (दि.२१) सकाळी १०.४० वाजता नाशिकरोड वरुन भुसावळ कडे जाणा-या रेल्वेखाली दोघांनी रेल्वेखाली आ’त्म’ह’त्या केल्याची माहिती ओढा रेल्वे स्टेशनचे उप प्रबंधक प्रमोद क्षत्रिय यांनी नाशिकरोड पोलिसांना दिली, नाशिकरोड पासून डाऊन लाईनवरील किलोमीटर क्रमांक १९२/०२ या ठिकाणी रेल्वे ट्रकवर दोन मृ’त’दे’ह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.

महिला व पुरषांचे मृ’त’दे’ह असलेल्या ठिकाणापासून जवळच रस्त्यावर एक दुचाकी (एमएच १५ एफ वाय ५३५८) पोलिसांना मिळून आली. सदर महिला जेलरोड येथील शोभा गंगाधर गोराडे (५१) रा. जेलरोड व त्यांचा भाचा रोषन बाळासाहेब नरवडे (२४) रा. पाथरे, ता. सिन्नर अशी आत्महत्या केलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्या भाच्याच्या आ’त्म’ह’त्येने खळबळ उडाली असून आ’त्म’ह’त्ये’चे कारण समजू शकले नाही. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संतोष घुगे व सचीन झाडे हे तपास करत आहे.
इथे किरणा मालावर मिळतेय ४० टक्क्यांपर्यंतची सूट.. ऑफर रविवार पर्यंतच (दि. २२ ऑगस्ट) मर्यादित
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरातील या भागात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) पाणी पुरवठा नाही
नाशिकरोड: आत्यासह भाच्याची रेल्वेखाली आ’त्मह’त्या