आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासालासुद्धा परवानगी; आजपासून बुकिंग सुरु….

नाशिक (प्रतिनिधी) : लॉकडाऊन नंतर “मिशन बिगीन अगेन” अर्थात अनलॉक टप्पा सुरु झाला. यामध्ये अनेक नियमांना शिथिलता देण्यात आली. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास रद्द केला. त्यानंतर आता मध्य रेल्वेने सुद्धा महत्वाचा निर्णय घेतला असून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला मान्यता दिली आहे.

मध्य रेल्वेने आज (दि.२) पासून गाड्यांचे बुकिंग सुरु केले आहेत. रेल्वेच्या आलेल्या पत्रकानुसार आरक्षण पद्धतीने प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे आता राज्यात रेल्वे वाहतूक सुद्धा सुरु होणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.