आता नाशिकमध्ये सुद्धा उपलब्ध होणार सीएनजी इंधन!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्याच्या आसपास नैसर्गिक गॅस म्हणजेच सीएनजी उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र नॅचरल गॅस (एनजीएनएल) कंपनीने इगतपुरी आणि दोडी बुद्रुक येथील केंद्रांवर सीएनजी ची विक्री सुरु केली आहे. याशिवाय आडगाव, पळसे, ढकांबे, खोपडी, जेलरोड या पाच ठिकाणी सुद्धा लवकरच सीएनजी केंद्र सुरु होणार आहे.

पेट्रोल आणि डिझेल सारख्यां इंधनांच्या तुलनेत सीएनजी ५० टक्क्यांहून अधिक स्वस्त दारात मिळते. स्मार्ट सिटीसाठी पर्यावरणपूरक इंधन महत्वाचे असते. मुंबई, पुणे, दिल्ली यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये सीएनजी इंधन मिळते. त्याप्रमाणेच आता स्थानिक पातळीवरसुद्धा इंधन उपलब्ध होणार आहे.