आईचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मुलाची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी) : आज (दि.17) देवळाली नजीक असलेल्या रोकडोबा वाडी येथे राहणाऱ्या 23 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून नैराश्य आलेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रशासन वारंवार सांगत आलंय की कोरोना झाला म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. तो बराही होतो. कोरोना झालेले अनेक जण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच अनेकांना आपला जीवही गमवावा लागलाय. परंतु आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आत्महत्या करण्याच्या या घटनेने सर्वांचेच मन हेलावून टाकले आहे.