अशा होणार मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा!

नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा या तीन सत्रात घेतल्या जाणार आहेत. सकाळ, दुपार, सायंकाळ या सत्रात घेण्यात येणार आहे. मुक्त  विद्यापीठाच्या परीक्षांसाठी संपूर्ण राज्यातून आणि बाहेरून १ लाख ९१ हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत तर सरासरी ऑफलाईन ४० हजार विद्यर्थी परीक्षा देणार आहेत. यापरीक्षा  वियार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन देता येणार असून या साठी विद्यापीठाकडून मोबाईल वापरला परवानगी देण्यात आली आहे. 

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बहूपर्यायी प्रश्न देण्यात येणार आहे.प्रत्येकाला ५० पैकी ३० प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. आणि प्रत्येक प्रश्न २ मार्कांचा असून १०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि पेपर सोडवण्यासाठी एक तासाचा कालावधी देण्यात येणार लॅपटॉप, डेक्सटॉप, मोबाईल, टॅब याद्वारे परीक्षा देता येणार आहे. ऑनलाईन परीक्षा देता वेळी लाईट गेल्यास किंवा इंटरनेटचा अडथळा आल्यास प्रक्रिया खंडित झाल्यास  पुन्हा नवीन पेपर न देता जिथून अडथळा आला किंवा पेपर खंडित झाला. तिथून पुन्हा पेपर देता येईल. तसेच पेपरच कालावधी हि वाढून देण्यात येईल.

विद्यापीठाकडून प्रॅक्टिकल परीक्षा चालू असून ३० सप्टेंबर पर्यंत चालू असणार आहे.५ ते ३० ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. गुरुवारी विदयापीठाकडून अंतिम वर्षाच्या विविध शिक्षणक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाईट्वर जाहीर केले जाणार आहे.  सकाळी ८ ते १ दुपारी ३ ते ८ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेगवेगळ्या कालावधीत परीक्षा घेतल्या जाणार आहेत .एक स्लॉट पाच तासांचा आहे. या कालावधीत विद्यार्थी पाहिजे त्या वेळी लॉगईन करून परीक्षा देऊ शकणार आहेत. लॉगईन केल्यानंतर विद्यार्थ्याला ओटीपी मिळणार आहे. त्यानंतर प्रश्न पत्रिका दिसणार आहे.