अबब.. नाशिक जिल्ह्यातून बुधवारी (दि. १४ एप्रिल) इतक्या लोकांनी केली कोरोनाची चाचणी

नाशिक जिल्ह्यातून बुधवारी (दि. १४ एप्रिल) इतक्या लोकांनी केली कोरोनाची चाचणी…

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील विविध लॅब मधून आज 21435 नमुने तपासणी अहवाल प्राप्त झाले. नाशिक मनपा क्षेत्रातील 12171 तपासण्यांपैकी 4076 नवीन बाधित रुग्ण आढळले म्हणजे पॉझिटीव्हीटी दर कमी होऊन 33% वर आला.

ग्रामीण भागात आज 8648 तपासण्यात 2585 नवीन बाधित सापडले म्हणजे 29% पॉझिटीव्हीटी दर आला. जिल्ह्याबाहेरील 107 रुग्ण ही आजच्या आलेल्या अहवालात बाधित आढळून आले,म्हणून बधितांचा आकडा आज जरी जास्त दिसत असला तरी वाढवलेल्या चाचण्या आणि कमी झालेला पॉझिटीव्हीटी दर हेही लक्षात घेण्यासारखे आहे..!