अटकपूर्व जामिनासाठी दाखल केली खोटी कागदपत्रे!

नाशिक (प्रतिनिधी) : अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याप्रकरणी दोघन्विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश ओझे आणि रफिक शेख असे संशयित आरोपींची नवे आहेत.

जामिर अल्ताफ शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एएस ऍग्री अँड अक्वा कंपनीचे संचालक संशयित कमलेश ओझे आणि रफिक शेख यांनी संगनमताने बनावट नोटराईझड तयार केली. आणि ती नाशिकच्या अटकपूर्व जामीन करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय येथे दाखल केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.