अखेर तिला न्याय मिळालाचं…

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात गुन्हेगारी व शोषणाचे प्रमाण अधिक आहे. मागील वर्षांपासून ते आतापर्यंत गुन्हेगारीच्या आकड्यांमध्ये खूप वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी पेठ तालुक्यातील कापुरझिरा येथे मुलींच्या बालगृहाच्या अधीक्षक कार्यालयात एका अल्पवयीन मुलीवर अधिक्षकाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. यामधील दोन आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने २०१५ साली बालगृहाच्या अधीक्षक कार्यालयात पीडित मुलीला बोलवून घेण्यात आले व तिच्यासोबत आरोपी अतुल याने शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली. यानंतर पीडितेने तिच्यासोबत घडलेली घटना अधीक्षक सुशीला यांना सांगितली. परंतु आरोपी हा त्यांचा मुलगा असल्याने त्यांनी त्यावर कारवाई करण्याऐवजी पीडितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत पेठ पोलीस स्टेशनमध्ये संशयितांविरूद्ध ३७६(क), (ड) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याचं प्रकरणाबाबत जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याची सुनवाई सुरू होती. शेवटी (दि.७) डिसेंबरला खटल्याची अंतिम सुनावणी झाली. यामध्ये आरोपी अतुल अलबाड व आई सुशीला अलबाड यांना दोषी मानुन शिक्षा सुनावण्यात आली. ह्या प्रकरणाची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. नायर यांनी केली