अंबड-लिंक रोडवरील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण…

नाशिक (प्रतिनिधी) : अंबड लिंक रोड वरील एका खाजगी रुग्णालयात गेल्या तीन ते चार दिवसांपासून एक महिला उपचारासाठी दाखल करण्यात आली होती. ती कोरोना पॉझिटिव्ह होती कि निगेटिव्ह यासंदर्भात माहिती अद्याप मिळाली नाही. त्यानंतर सोमवारी (दि.०३) त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी त्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर दिनेश पाटील यांना मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सगळीकडे व्हायरल झाले आहेत.

रुग्णालयात भरलेले डिपॉझिट म्हणून जमा केलेले पैसे सुद्धा डॉक्टरांनी परत दिले नाही. त्यावरून डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावरून संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड करून डॉक्टरला मारहाण केली. या संदर्भात अंबड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.