शनिवारी अंबड भागात वीजपुरवठा राहणार बंद !

नाशिक (प्रतिनिधी) : शनिवारी (दि.५ ) रोजी महावितरणतर्फे औद्योगिक वसाहतीतील बऱ्याच फिडरवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे अंबड भागात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
महावितरणकडून ३३ केव्हीच्या ४ फिडरवर ही दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे हेलडेक्स, ग्रॅब्रिएल, गेटवे, अबिलिअन, सुदाल, किम्प्लास येथील २२ केव्ही फीडर्सवर याचा परिणाम होणार आहे. दरम्यान, वसाहतीतील प्लॉट क्रमांक बी, के, पी, एन, ए, दुकाने, प्लॉट डब्ल्यू क्रमांक-१ ते डब्ल्यू ११, सुदाल, किम्प्लास या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.