अंबड एमआयडीसीतील कंपनीत लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

नाशिक (प्रतिनिधी): अंबड  एमआयडीसीतील अमोल इंडस्ट्रीज कंपनीत आग लागण्याची घटना रविवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आहे,ह्या आगीत  कंपनीतील सामग्री जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहेत. नाशिकच्या अंबड एमआयडीसी  मधील अमोल इंडस्ट्रीज हया कंपनीला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच तारांबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच सिडको आणि अंबड अग्निशामन विभागाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत पाच मोल्डींग मशीन ,सि सि टिव्ही कॅमेरे, राँ मटेरियल आणि तयार मटेरियल जळून खाक झाले होते, सुदैवाने या घटनेत कुठलीही  जीवितहानी झाली नाही. आगीच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून शॉक सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.