अंधश्रद्धेचा प्रकार: हाथमोड या घोरपडीच्या सांगाड्याची विक्री करणाऱ्याला अटक !

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
अंधश्रद्धेच्या माध्यमातून गैरप्रकार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हाथमोड या घोरपडीच्या सांगाड्याची विक्री करणाऱ्या एका आरोपीला वन विभागाने नाशिक येथे अटक केली असून,घोरपाडीच्या सांगाड्याचे काही भाग वनविभागाने जप्त केले आहेत. आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आजवर आपण अनेक असे प्रकार पाहिले असतील, ज्यात अंधश्रद्धेचा आसरा घेऊन त्या आधारे केल्या जाणाऱ्या गैर प्रकाराच्या माध्यमातून अनेक वन्य जीवांचा नाहक बळी दिला जातो. तर काही प्राण्यांच्या शरीराचे भाग देखील अशा अनेक अंधश्रद्धेच्या प्रकारात वापरले जातात. तर तशी मागणी देखील ह्या मुक्या प्राण्यांची जिवंत अथवा मृत स्वरूपात असते. अशा गैरप्रकारात अनेक वन्यप्राण्यांचा जीव अशा गैर कामांसाठी आजच्या ह्या प्रगत युगात देखील घेतला जातो.

अशाच एका घटनेत, त्रंबकेश्वर येथे राहणारा धर्म पवार हा नाशिक शहरामध्ये घोरपड या वन्य प्राण्याचे अवयव हाथमोड विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळली होती. त्यानुसार सापळा रचून पवार याला नाशिकच्या द्वारका परिसरातून घोरपाडीच्या अवयवांसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता हे घोरपडचे अवयव त्याने विक्री हेतू आणल्याचे सांगण्यात आले व हा संपूर्ण प्रकार त्याने समोर मांडला त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आलेय..

पवार याला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.. या संपूर्ण प्रकारामुळे असे दिसुन येते की, आजच्या ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अजूनही अंधश्रध्येसाठी वन्य प्राण्यांचा नाहक जीव घेतला जातो.. त्यामुळे अशा अंधश्रध्दा पासरावणाऱ्यांवर कठोर शिक्षा केली पाहिजे जेणेकरून भविष्यात या प्रकारच्या घटनांना आळा बसेल..!