अँटी करप्शन ब्युरोकडून शिवाजी चुंभळेंची चौकशी सुरु

अँटी करप्शन ब्युरोकडून शिवाजी चुंभळेंची चौकशी सुरु

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या काळात झालेल्या कामकाजाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चुंभळे यांच्या काळातील विविध कामांची माहिती बाजार समिती सचिवांकडे मागितली आहे. त्यामुळे चुंभळे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निशाण्यावर आले आहे.

सन २०१७ ते २०२० या कार्यकाळात शिवाजी चुंभळे हे नाशिक बाजार समितीचे सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात विविध कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज गेला होता. त्यानुसार विभागाने चौकशी सुरू केली आहे. बाजार समितीला सोमवारी पत्र दिले आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

चुंभळेंच्या काळात ३० बांधकामे झाली. याबाबत पत्रात उल्लेख आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया, मंजुरी व कोणी दिली, निविदा कधी व कोणत्या प्रसार माध्यमांत प्रसिद्ध केली, निविदेचा कालावधी, निविदा कोणी व कधी मंजूर केल्या, कोणाच्या निविदा प्राप्त झाल्या व त्यांची कागदपत्रे, कोणाची निविदा स्वीकारली, त्याची कागदपत्रे, मंजूर कामास सुरुवात कधी, काम पूर्ण कधी, त्यापोटी किती बिल अदा केले व कोणाच्या आदेशानुसार, कामाचा परिक्षण अहवाल, मूल्यांकन व पूर्णत्वाचा दाखला कोणी दिला, अंतिम देयके सादर केले असल्यास त्यासंबंधी कागदपत्रांसह चुंभळे यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी झाली असल्यास त्या अधिकाऱ्यांची नावे, अशी माहिती व कागदपत्रांच्या छायांकित प्रती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागविल्या आहेत.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

फायद्यात नेलेली समिती आता कर्जबाजारी
मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. तोट्यात असलेली समिती प्रथमच नफ्यात आणली. कर्मचाऱ्यांसह बँकेची देणी, ग्रॅच्युइटीचे १३ कोटी रुपयांचे देणे दिले. त्र्यंबकच्या इमारतीसाठी २६ कोटी रुपयांचे फिक्स डिपॉझिट केले हाेते. आता आम्ही ठेवलेले २६ कोटी रुपये संपल्याचे दिसून येते अशी प्रतिक्रीया माजी सभापती शिवाजी चुंबळे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..

या कामांची होणार चौकशी
ई-नाम योजनेतील सेलहॉल दुरुस्ती, समितीचे लोखंडी प्रवेशद्वार, व्यापारी संकुलाची साफसफाई, शरदचंद्रजी पवार मार्केट साफसफाई, ड्रेनेज दुरुस्ती, टोमॅटो मार्केट केबिन, कांदा मार्केटमधील ट्रिमोकस काँक्रीटीकरण, बाजार समिती कार्यालय सीसीटीव्ही या कामांची लाचलुचपत विभागाकडून चौकशीची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा आणि इतर निर्बंधांबाबत अतिशय महत्वाची बातमी…